मतदान करा, उपचारांवर सवलत मिळवा!

मतदान करा, उपचारांवर सवलत मिळवा!

मतदान करा, उपचारांवर सवलत मिळवा!
वाशीतील क्लिनिकचा निर्णय
वाशी, ता. १२ (वार्ताहर) ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना आवाहन करीत आहेत. असाच एक उपक्रम वाशी येथील आयुर्वेद उपचारांत वीस वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. अविनाश देवरे व डॉ. सुप्रिया बोडके यांनी मतदानाचा हक्‍क बजावणाऱ्या नागरिकांसाठी २० टक्‍के सवलत देण्याचे ठरवले आहे.
सोमवारी (ता. २०) मतदान केल्याचे दाखवा आणि त्यांच्या रुण्यालयामध्ये २० टक्के सवलत मिळवा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. मतदानाचा टक्का वाढवा, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ज्येष्ठांसाठी उपचारांमध्ये सवलत असणारे किंवा तत्सम उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो. आता निवडणुकांचे वातावरण आहे. मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे. यासाठी समाजातील सर्वच स्तरांतून प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. काही सामाजिक संस्था पुढाकार घेऊन पत्रके वाटत आहेत. युवकांचे गट पथनाट्याद्वारे जनजागृती करत आहेत. समाजातील प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्या परीने नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागृती व्हावी, यासाठी प्रयत्‍न करीत आहे.
मतदानाच्या दिवसापासून म्हणजेच २० मेपासून ते ३० मेपर्यंत श्री साई आयुर्वेदिक पंचकर्म रुग्णालय व वंध्यत्व निवारण केंद्र, वाशी, सेक्टर ९ येथे पंचकर्म (मसाज, स्टीमबाथ, शिरोधारा) उपचार घेतल्यास २० टक्के सवलत देण्याचा निर्णय डॉ. अविनाश देवरे यांनी घेतला आहे.

मतदानाचा टक्‍का वाढावा, यासाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्‍था प्रयत्‍न करीत आहेत. या कार्यात आपणही योगदान द्यावे, यासाठी क्लिनिकमध्ये उपचार खर्चात सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
- डॉ. अविनाश देवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com