पवार गटाचे शहराध्यक्ष वडनेरे यांचा राजीनामा

पवार गटाचे शहराध्यक्ष वडनेरे यांचा राजीनामा

पवार गटाचे शहराध्यक्ष वडनेरे यांचा राजीनामा
बदलापुरात राजकीय भूकंप

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडींना वैतागून पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने, बदलापूर शहरात राजकीय भूकंप अनुभवायला मिळत आहे.
येथील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, राजकीय पक्षातील अंतर्गत राजकीय वातावरणात सतत होणारा कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला अंतर्गत राजकारणाचा फटका सहन करावा लागत आहे. राज्य पातळीवर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार व अजित पवार असे दोन गट झाल्यानंतर कार्यकर्त्यांची नाराजी, अंतर्गत धुसफूस याचा परिणाम पक्षांवर होत आहे. शरद पवार गटाच्या बदलापूर शहर कार्यकारिणीतील अंतर्गत धुसफूस आता बाहेर पडत आहे. कालच पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बदलापूर शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनीसुद्धा ही अंतर्गत धुसफूस अनुभवली आणि ती दूर करण्याचा प्रयत्नदेखील केला; मात्र असे असतानाही आज पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत, असे जाहीर केले. शहरातील प्रदेश कार्यकारिणीवरील काही पदाधिकारी हे गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कुरघोडीचे राजकारण करत असून, या कुरघोडीला वैतागून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे शैलेश वडनेरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com