मोदी सरकारला धडा शिकवा ः शरद पवार

मोदी सरकारला धडा शिकवा ः शरद पवार

मोदी सरकारला धडा शिकवा : शरद पवार

खर्डी, ता. १२ (बातमीदार) : ‘असत्याचा आधार घेऊन चुकीच्या गोष्टी करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वासिंद येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले.
संजय राऊत या वेळी म्हणाले की, दहा लाखांचा सूट घालणारे पंतप्रधान म्हणजे खोटे बोलण्याचे मशीन आहे. भिवंडी लोकसभेत १०० टक्के बदल होणार आहे. मोदी, शहा व फडणवीस यांच्या अहंकारी राजकारणाला गाडण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन या वेळी संजय राऊत यांनी केले. भाजप सरकारने देशावर २१० लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. देशात ठराविक लोक श्रीमंत झालेत. त्यामुळे देशात आर्थिक विषमता तयार झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला. जितेंद्र आव्हाड यांनी, संविधान बदलले तर आपले काय होणार, या विचाराने आदिवासी बांधव घाबरले आहेत, असे सांगितले. शरद पवार यांना राजकारणातून संपविण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ यांना भाजपने सुपारी दिली असल्याचा आरोप या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. रोहित पवार म्हणाले, भाजपकडे पैसा व दबावतंत्र आहे, कुटुंबे फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपला हद्दपार करा, भाजप २००च्या पुढे जाणार नाही, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com