प्रतिक्रिया २

प्रतिक्रिया २

मतदानाचा हा चौथा टप्पा असून हा टप्पा निर्णायक मानला जात आहे. मागील तीन टप्प्यांमध्ये कमी मतदान झाले. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे. मतदानाचा टक्का कमी होणे ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. सर्वांनी लोकशाहीच्या महोत्सवात हिरिरीने भाग घेऊन जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवावा. प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी झाली आहे.
- विजय पाटील, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल
…………………………..
उन्हाचा तडाखा असला तरी प्रशासनाकडून आरोग्यासंदर्भात सर्व उपाययोजना केल्या आहेत. सकाळ व सायंकाळच्या सत्रात मतदानाला बाहेर पडा. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
- डाॅ. सुनील नखाते, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल
……………………….
देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे कित्‍येक तरुण आज नोकरीविना घरी आहेत. गत अनेक वर्षांपासून राज्यात एकही नवा प्रकल्प आला नाही. राजकारणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतात; परंतु अद्यापही कोणत्याच सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नाही. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणाऱ्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे.
- संजय शेडगे, मतदार, कळंबोली
…………….
शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराचा विचार करून मी या निवडणुकीत मतदान करणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्‍यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्‍यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक विषयांवर जो पक्ष काम करेल, अध्यापन आणि संसाधनांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्‍न करेल, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य असेल.
- कल्याणी गुंजवटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com