ठाणे पान दोन पट्टा

ठाणे पान दोन पट्टा

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
डोंबिवली (बातमीदार) : ब्राह्मण महासंघ आणि सर्व संलग्न ज्ञाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरिअल ट्रस्टच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रविवारी (ता. १२) सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कऱ्हाडे सेवा मंडळाच्या समाजमंदिर हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन डॉ. अरुण नाटेकर यांच्या हस्ते झाले. शिबिरात ६९ बाटल्या रक्तसंकलित केले. रक्तदान शिबिराला अनघा बोंद्रे, नीलेश वीरकर, जयंत कुलकर्णी, उल्हास दाते, योगेश वीरकर, अभिजित कानिटकर, विवेक वामोरकर, संदीप पुराणीक, प्रज्ञेश प्रभुघाटे, अरुण कुवळेकर, माधुरी जोशी, माधुरी येल्लापूरकर, उचिता निमकर, अथर्व जोशी, आदिती जोशी, विनायक जांभेकर, क्षमा धामणकर, डॉ. अभय कानिटकर, जे. के. जोशी, प्रशांत जोशी, मनीषा धोपटकर आदी उपस्थित होते.

स्वावलंबी बनण्यासाठी महिलांना प्रशिक्षण
ठाणे (बातमीदार) : सगळ्याच महिलांना कामासाठी घर सोडून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी संघर्षच्या माध्यमातून महिलांना विविध कलांचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. त्यात ज्वेलरी मेकिंग, मेहंदी कॉल्थ आर्ट यांसारख्या कलांचा समावेश होता. महिलांनी या प्रशिक्षण शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तसेच सहभागी महिलांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. आव्हाड यांच्या संकल्पनेतून संघर्ष संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष मोफत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन कावेरी सेतू येथे केले होते. महिलांना अँटीक ज्वेलरी मेकिंग म्हणजेच खणाचे तसेच कपड्याचे विविधरंगी दागिने, कानातले, बांगड्या आणि नथीचे प्रकार बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे युनिक मेहंदी आर्ट या प्रशिक्षणात अरेबिक, मंडाला आर्ट, बेबी एलिफंट, दुबई पॅटर्न टाईप ऑफ लिव्ह, झुमका, ब्राईड पॅच अशा प्रकारचे बरेच प्रकार शिकवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com