जुनी दगडी बिल्डींगचा भाग कोसळला

जुनी दगडी बिल्डींगचा भाग कोसळला

धारावी (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया मार्गावरील १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या दगडी इमारतीच्या एका बाजूचा भाग आज (ता. १३) दुपारी अचानक कोसळला. या भागात कोणीही राहात नसल्याने जीवितहानी झाली नाही. भिंत कोसळताच स्थानिक रहिवाशांनी पोलिस आणि अग्निशमन दलास याची माहिती दिली. पालिका अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून धोकादायक भाग सील केला आहे. दगडी इमारत आणि आसपासचा परिसर हा खासगी मालकीचा आहे. भिंत कोसळलेल्या भागात राहणारे मालक गेल्या अनेक वर्षांपासून इतरत्र राहत आहेत.
……
धारावी : संत कक्कया मार्गावरील जुन्या दगडी इमारतीचा भाग कोसळला.
…..
मुलुंडमध्ये उत्तर भारतीय स्नेहसंमेलन उत्साहात
मुलुंड (बातमीदार) : मुलुंडमध्ये उत्तर भारतीय स्नेहसंमेलन रविवारी (ता. १२) उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम मुलुंड पश्चिमेतील दयानंद बँक्वेट हॉल येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी प्रसिद्ध लोकगायक चरणजीत यादव यांनी लोकगीत सादर केले. यावेळी माजी आमदार चरणसिंग सप्रा, सुनील गंगवानी, भरत सोनी, रमाशंकर तिवारी, संजय ओझा, अब्राहम राय मणी, राजोल संजय पाटील, सुनंदा सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
….
मोरे भावकीची श्री कुलदैवत महापूजा
घाटकोपर (बातमीदार) : स्वानंद सुखनिवासी गुरुमाऊली तपोनिधी गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच विशेष संशोधित शिवथर घळ सुंदर मठाचे संशोधक परमपूज्य सद्‌गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या प्रेरणेने पोलादपूर तालुक्यातील अडावळे बुद्रुक गावात कुलदैवताची श्री सत्यनारायणाची महापूजा नुकतीच पार पडली. यावेळी सकाळी कुलदैवत अभिषेक, सत्यनारायण महापूजा, भजन आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मु.पो. अडावळे बुद्रुक ग्रामस्थ मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com