वीटभट्टी व भाजीपाला उत्पादकांचे नुकसान

वीटभट्टी व भाजीपाला उत्पादकांचे नुकसान

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : खर्डी-कसारा परिसरात अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जोरदार वादळी-वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे, लग्नमंडपाचे नुकसान झाले आहे. शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयाशेजारी असलेले झाड कोलमडून मोटारसायकलवर पडल्याने सहा मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. अजनुप, दहीगाव, कळमगाव, खर्डी, वेळूक-वाशाळा व आटगाव परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्च्या वीटांची माती झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच येथील भेंडी, उडीद, वाल, हरभरा, तूर यांसारख्या पिकांवर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा व मोगरा बागायतदारांचे नुकसान झाले आहे. गुरांसाठी जमा करून ठेवलेला चारा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com