वर्तकनगरातील रहिवाशांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

वर्तकनगरातील रहिवाशांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
वर्तकनगर येथील इमारतीचा १२ वर्षे पुनर्विकास रखडला

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर १२ इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे गाऱ्हाणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले.

निविदाप्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए. ए. असोसिएट्‌स या विकसकाची निवड करण्यात आली. २०१४ मध्ये विकास करारनामा करण्यात आला. करारनाम्यानुसार २०१६ मध्ये कॉर्पस फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार २७ सभासदांना प्राप्त झाला. यातील पाच सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही, कारण विकसकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. २०१६ मध्ये ठाणे महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने नोटीस दिली, याबाबत दूरध्वनीवरून विकसकाला अवगत करण्यात आले. त्यावर विकासकाने सर्व घरे खाली करा, मी तुम्हाला भाडे सुरू करतो, असे दूरध्वनीवरून सांगितले. २०१७ मध्ये ठाणे महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घरे खाली करण्यास भाग पाडले. इमारत खाली केल्याने सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्षे अशीच गेली. त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकसकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि २०२० मध्ये नोटीस देण्यात आली. यामध्ये रहिवाशांची फसवणूक झाल्याने २०१६ पासून या इमारतीतील रहिवासी बेघर झाले आहेत. तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com