१०४ वर्षांच्या आजीने 
केले गृहमतदान

१०४ वर्षांच्या आजीने केले गृहमतदान

उत्तर पूर्व मुंबईत ६८ जणांचे गृह मतदान
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत २,३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. तसेच ज्येष्ठ ३३; तर दिव्यांग दोन मतदारांनी असे एकूण ३५ मतदारांनी गृहमतदान पद्धतीने मतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. तसेच १३२ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. १९० पैकी ३३ ज्येष्ठ नागरिक आणि दोन दिव्यांग अशा ३५ मतदारांनी मतदान केले आहे; तसेच २,३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. यात धुळे मतदारसंघासाठी २२, दिंडोरीसाठी १०, नाशिकसाठी ३१, पालघरसाठी ३९, भिवंडीसाठी २४२, कल्याणसाठी २३७, ठाणेसाठी २१०, मुंबई उत्तरसाठी ७३, मुंबई उत्तर पश्चिमसाठी ७५, मुंबई उत्तर पूर्वसाठी ८१६, मुंबई उत्तर मध्यसाठी १५२, मुंबई दक्षिण मध्यसाठी ३०६, मुंबई दक्षिणसाठी ९६ असे एकूण २,३०९ मतदारांनी मतदान केले आहे.
….
१०४ वर्षांच्या आजींनी बजावला गृहमतदानाचा हक्क
मुंबई, ता. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत १३ मेपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दहिसर मतदारसंघात गृहमतदान पार पडले. १०४ वर्षे वयाच्या लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे गृहमतदानाचा हक्क बजावला. दहिसर विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाकरिता एकूण ६८ नोंदणीकृत पात्र मतदार आहेत. यापैकी एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. आज जे मतदार मतदान करू शकले नाहीत, ते १६ मे रोजी मतदान करू शकणार आहेत.
…..

घाटकोपरमध्ये गृहमतदानाचा उत्साह
घाटकोपर (बातमीदार) : घाटकोपर पश्चिममध्ये ८५ वर्षांवरील नागरिकांचे गृहमतदान पार पडले. यात लीलावती शहा (८५), शांताराम गणपत बाणे (९२), नेनसी रावजी वीरा (९३), शांती मुकुंद परब (८९), मधुकर गोविंद वांगे (९०), धनीबेन पोपट सावला (८९), प्रमिला शांताराम बाणे (८८), कुमुदिनी मधुकर गुप्ते (९१) यांच्यासह अन्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती वाघ, चैतन्य वानखडे, आचार संहिता पथक प्रमुख किशोर केदारी, क्षेत्रीय आयुक्त संगरक्षक वाघमारे आदी उपस्थित होते.
….
घाटकोपर : लीलावती शहा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
…..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com