मावळचे मतदान घसरले

मावळचे मतदान घसरले

मावळचे मतदान घसरले

नवी मुंबई, ता. १३ : कडाक्याचे ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका मावळ लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला बसला. संध्याकाळी आलेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे घरात बसलेल्या मतदारराजाला बाहेर पडता आले नाही. पनवेल, उरण आणि कर्जत तालुक्यातील अनेक केंद्रांवर वीज खंडित झाल्यामुळे काळोखात मतदान प्रक्रिया पार पडली. परिणामी, मावळ, पिंपरी, चिंचवड, कर्जत, पनवेल आणि उरण या सर्व विधानसभा मतदारसंघांत मतदानाची आकडेवारी २०१९च्या निवडणुकीपेक्षा कमी झाली. मावळमध्ये एकूण ५२.३० टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.
पनवेल, उरण या भागातील ग्रामीण भागात महावितरणचे वीज खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तळोजा, वांगणी, कुत्तरपाडा, नेरे, भिंगारी या भागात वीज गेल्यामुळे मतदारांना केंद्रांवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मतदान करावे लागले. तळोजा परिसरातील एका गावात केंद्रावर ईव्हीएम मशीनवर कोणते बटण दाबले, याबाबत संभ्रम असल्याचे काही मतदारांनी मतदान करून आल्यावर सांगितले. वीज गेल्यामुळे केंद्रात व्हीव्हीपॅट मशीनमध्ये केलेल्या मतदानाची चिठ्ठी न दिसल्यामुळे मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत गोंधळ निर्माण झाला होता. अनेक केंद्रांवर पर्यायी विजेची व्यवस्था नसल्यामुळे पनवेल, उरण आणि कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील मतदान काळोखातच उरकावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com