ठाण्यात ५० हून अधिक झाडे कोसळली

ठाण्यात ५० हून अधिक झाडे कोसळली

ठाण्यात ५० हून अधिक झाडे कोसळली
बदलापूरात गारपीट, जिल्ह्याला तडाखा

ठाणे, ता. १३ (वार्ताहर) सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने ठाणे शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. वादळी वारा आणि पावसाच्या धारांच्या मारा सहन न झाल्याने ठाणे शहरात ५० हून अधिक झाडे कोसळली. तर त्याहून दुप्पट झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यांवर पडल्या. अनेक ठिकाणी पाणी साचले, पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्याने ठाणेकरांची दैना उडाली. कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याच्या काही भागाचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे जिल्ह्यात बदलापूरसह ग्रामीण भागांमध्ये गारांसह पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले.
ठाण्यासह जिल्ह्यात सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांतच सोसायट्याचा वारा आणि मुसळधार अवकाळी पावसामुळे बेसावध नागरिकांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी ठाण्यात इंटरनेट सेवा बंद पडली. तर टेकडी बंगला परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. वाऱ्यामुळे लोखंडी गेट ही पडल्याच्या घटना घडल्या. ठाणे बाजारात परिसरात वाऱ्यामुळे तर कंपाउंड केलेले पत्रे कोलमडून पडले. मुख्य बाजारपेठेत घरातही खिडकीची ग्रील आणि पत्रे उडाले आणि खाली पडले. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर हुंदाई शोरूम समोर दुभाजकावर असलेले झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.


..
आपत्ती व्यवस्थापन नॉट रिचेबल
ठाण्यात मुसळधार पावसाने कहर केल्यानंतर एका तासात ठाणेकरांचे जनजीवन विस्कळित झाले. तर पडझडीच्या घटनेने आपत्ती व्यवस्थापन विभागाचा फोन खणखणू लागला. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही त्रेधा उडाली. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन ‘नॉट रिचेबल’ झाले. भास्कर कॉलनी, सरस्वती शाळेसमोर, क्लासिक प्लाझा, बी केबिन गौतम वाडी, जय भगवान हॉल, अमर सोसायटी येथे झाडे पडली आहेत. चिखलवाडी समोर मोठा जाहिराती बोर्ड पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीचा चक्का जाम झाला.

ठळक घटना
- दादोजी कोंडदेव स्टेडियम, आनंद नगर चेकनाका येथे पाणी साचले.
- येथे रस्त्यावर पाणी साचले.
- आनंद नगर ठाणे पूर्व येथे घरावर झाड पडले.
- ठाणे पूर्व एमएसईबी ऑफिस जवळ वाहनावर झाड पडले.
- ठाण्याच्या हरिनिवास सर्कल एम.जी. रोड येथे मोठी झाडे पडली
- कोपरीतील मलबार ज्वेलर्स येथे मोठे झाड कोसळले.
- ठाणे काँग्रेस कार्यालयाच्या जवळ मोठे झाड उन्मळून पडले.
- दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आसपास अनेक झाडे पडल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com