उपमुख्यमंत्री आज मिरा भाईंदरमध्ये

उपमुख्यमंत्री आज मिरा भाईंदरमध्ये

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. १४) मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मिरा रोड येथील सेव्हन इलेव्हन शाळेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पालकमंत्री शंभूराज देसाई, अभिनेत्री रूपाली गांगुली, तसेच महायुतीचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही १८ मे रोजी प्रचारासाठी मिरा भाईंदरमध्ये आणण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com