कुटुंबाचा आधार असलेल्या मुलावर मृत्यूचा घाला

कुटुंबाचा आधार असलेल्या मुलावर मृत्यूचा घाला

कुटुंबाचा आधार असलेल्या मुलावर मृत्यूचा घाला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत २४ वर्षाच्या भरत राठोड मृत्यू

घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) मुंबईत सोमवारी अवकाळी पावसाने थैमान माजविले. वादळी वाऱ्याच्या वेगाने घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपावर असलेला जाहिरातीचे मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. या घटनेत अनेकजण दबले गेले. आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाले असून अनेक जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या होर्डिंग दुर्घटनेत २४ वर्षीय भरत वसंत राठोड याचा मृत्यू झाला. भरत हा मेडिकलमध्ये औषधांची डिलिव्हरी करण्याचे काम करतो. सोमवारी (ता.१३) पूर्व द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपावर भरत आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. याचवेळी अचानक जाहिरातीचा लोखंडी कमान खाली कोसळल्याने यात भरत मृत्यू झाला.


भरत राठोड हा घाटकोपर पश्‍चिम, गोळीबार रोड येथील गणेश चौकात राहत होता. दोन वर्षापूर्वी त्यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.आता कुटुंबाचा आधार असलेल्या थोरल्या मुलाच्या मृत्यूने राठोड कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. वसंत राठोड यांना दोन मुले आणि एक मुलगी. वर्षभरापूर्वी मुलीचे लग्न झाले तर लहान भाऊ शिकत आहे. भरत मेडिकलमध्ये औषध डिलिव्हरी करण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. राठोड कुटुंबाची घरची आर्थिक स्थिती हलाखीची नाही. भरत मेडिकलमध्ये काम करून आपल्या परिवाराचा गाडा चालत होता. मात्र आता कुटुंबाला सांभाळ करणारा मुलगाच गेल्याने या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरत राठोड यांच्या मृत्यूच्या बातमीने गणेश चौकात शोककळा पसरली आहे.

भरत राठोड हा सोमवारी दुपारी दुचाकी पेट्रोल भरण्यासाठी त्या पेट्रोल पंपावर गेला होता. आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली. त्याची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पूर्ण घराचा भार मोठा मुलगा म्हणून भरतवर होता.
- दत्ताराम रिंगे, स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com