पोलादपूरमध्ये टेंपो पलटी होऊन एक ठार

पोलादपूरमध्ये टेंपो पलटी होऊन एक ठार

पोलादपूरमध्ये टेम्पो उलटून एक ठार
काटेतळीजवळील घटना; तीन जण गंभीर जखमी

पोलादपूर, ता. १४ (बातमीदार) : पोलादपूर-नागाव-विन्हेरे रस्त्यावर काटेतळी गावानजीक भाजीपाला वाहतूक करणारा टेम्पो उलटून एकाचा मृत्यू झाला; तर तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १४) रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, श्रीकांत विलास पिसाळ (राहणार ओझर्डे, ता. वाई) हा टेम्पोचालक भाजीपाला व तिघा प्रवाशांना घेऊन विन्हेरे मार्गे पोलादपूरहून मंडणगडकडे निघाला होता. त्या वेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटून काटेतळी हद्दीत टेम्पो उलटा झाला. या वेळी आनंदा अंकुश कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुषार लालसिंग भिलारे (वय २८, रा. सोमर्डी, ता. जावळी), राजेंद्र बबन गाडवे (वय ५५, रा. गाडवेवाडी, ता. वाई), सुमन अशोक जमदाडे (वय ५०, रा. आधार हॉस्पिटलजवळ, हनुमाननगर, वाई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल जाधव, पोलिस नाईक घुले हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com