वडाळा दुर्घटनेप्रकरणी तीन विकासक, कंत्राटदारावर गुन्हा

वडाळा दुर्घटनेप्रकरणी तीन विकासक, कंत्राटदारावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १४ : वडाळा पूर्वेतील बरकतअली नाका पार्किंग लिफ्ट गाड्यांवर कोसळून १८ गाड्यांचे नुकसान झाले. यात दोन जण जखमी झाले होते. याप्रकरणी तीन विकासकांसह एका कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीजी टॉवरमध्ये मेटल पार्किंग लिफ्ट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिनेश पुरोहित, हेमचंद्र पुरोहित आणि राजेश झुनझुनवाला आणि कंत्राटदार अमन अर्नेजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वडाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी दिली. या दुर्घटनेत आठ ते १० जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. क्रेनच्या मदतीने लिफ्टचे भाग काढण्यात आले. काही भाग गॅस कटरने वेगळा करण्यात आला. या कामादरम्यान येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.    
---
वडाळा  येथील दुर्घटनेला विकासकासोबत प्रशासनही जबाबदार आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी.
- विजय शिंदे, स्थानिक रहिवासी 

वडाळा येथील श्रीजी टॉवरमधील पार्किंग लिफ्ट बेकायदा असून बिल्डर, कंत्राटदार, आर्किटेक्ट आणि पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
- अजय काटे, स्थानिक 

माझ्या दोन गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. लिफ्ट कोसळल्यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. 
- हनीफ खान, वाहनमालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com