शहरात १०३ झाडे उन्मळून पडले

शहरात १०३ झाडे उन्मळून पडले

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शहरात झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून पडण्याच्या १०३ घटना घडल्या. या घटनांमध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे रस्त्यांवर पडलेली झाडे आणि झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याने रस्त्यावर जागोजागी पालापाचोळ्याचा कचरा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक कोंडीदेखील होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभाग सात ते आठ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

ठाणे शहरातील विविध भागातील ८८ झाडे व १५ झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले होते. त्यात ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अणि अग्निशमन केंद्राने युद्धपातळीवर पडलेली झाडे कापून रस्ता मोकळा केला आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला पडलेल्या झाडांच्या फांद्या कचऱ्याचा ढीग लागल्याचे दिसून आले. याबाबत ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण उपायुक्त सचिन पवार यांना विचारले असता, सात ते आठ गाड्यांच्या माध्यमातून पालापाचोळ्याचा कचरा उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com