अर्थ - एप्रिलची चलनवाढ १.२६ टक्के

अर्थ - एप्रिलची चलनवाढ १.२६ टक्के

एप्रिलची चलनवाढ १.२६ टक्के
१३ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
मुंबई, ता. १४ : एप्रिल महिन्यात खाद्यान्न आणि विशेषतः भाज्या महाग झाल्यामुळे होलसेल चलनवाढीने १.२६ टक्के म्हणजेच १३ महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला.
होलसेल किंमत निर्देशांक आधारित डब्ल्यूपीआय चलनवाढ गेले दोन महिने सतत वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात ०.२० टक्के, मार्च महिन्यात ०.५३ टक्के ही चलनवाढ होती. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात ही चलनवाढ ०.७९ टक्के होती.
एप्रिलची चलनवाढ १३ महिन्यांतील उच्चांकी असून यापूर्वीची यापेक्षाची जास्त चलनवाढ मार्च २०२३ मध्ये १.४१ टक्के एवढी नोंदवण्यात आली होती. मात्र एप्रिल महिन्यात अन्नधान्य, वीज, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, तयार अन्नपदार्थ व अन्य उत्पादने यांचे भाव वाढल्यामुळे चलनवाढ झाली, असे व्यापार आणि उद्योग मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. त्यांच्याकडील तपशिलानुसार अन्नधान्याची चलनवाढ ७.७४ टक्के झाली, मार्च महिन्यात ती ६.८८ टक्के होती; तर इंधन आणि ऊर्जा क्षेत्राची चलनवाढ १.३८ टक्के होती, ती मार्च महिन्यात उणे ०.७७ टक्के होती.
एप्रिल महिन्यात भाज्यांची चलनवाढ २३.६० टक्के होती. मागील महिन्यात ती १९.५२ टक्के होती. बटाट्याची चलनवाढ ७१.९७ टक्के होती, ती मागील महिन्यात ५२.९६ टक्के होती; तर कांद्याची चलनवाढ मार्चमधील ५६.९९ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ५९.७५ टक्क्यांवर टक्क्यांवर गेली. अर्थात रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या किरकोळ चलनवाढीत (रिटेल इन्फ्लेशन) घट होत आहे. आरबीआयने एप्रिलमध्ये ही चलनवाढ ४.८३ टक्के म्हणजे ११ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर असल्याचे दाखवून दिले.

चलनवाढ होईल
गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलासह विविध वस्तूंचे दर वाढत असून ही चलनवाढ येत्या दोन महिन्यात म्हणजे मे आणि जूनसाठी दोन टक्क्यांवरही जाऊ शकते, असा अंदाज आय.सी.आर.ए.च्या मुख्य अर्थतज्‍ज्ञ आदिती नायक यांनी वर्तवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com