अर्थ - निर्देशांकांची तिसरी वाढ

अर्थ - निर्देशांकांची तिसरी वाढ

निर्देशांकाची तिसरी वाढ
सेन्सेक्स ३२८ अंश वाढला

मुंबई, ता. १४ : धातू निर्मिती कंपन्या तसेच तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्या यांच्या शेअरच्या खरेदीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सलग तिसऱ्या दिवशी वाढ दाखवली. सेन्सेक्स ३२८.४८ अंश तर, निफ्टी ११३.८० अंशांनी वाढला. सेन्सेक्स आज पुन्हा ७३ हजारांवर गेला.
आज सकाळपासून भारतीय शेअर बाजार निर्देशांक तेजी दाखवत उघडले. थोड्याच वेळात सेन्सेक्सने ७३ हजारांचा टप्पा पार केला व तो दिवसभर त्र्याहत्तर हजारांच्या वरच राहिला. शेवटच्या तासाभरात थोडी नफावसुली झाली, तरी त्याने ७३ हजारांचा स्तर खालच्या दिशेने तोडला नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ७३,१०४.६१ अंशावर तर निफ्टी २२,२१७.८५ अंशावर स्थिरावला.
आज निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्का वाढले. निफ्टी मेटल पावणेतीन टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस पावणेदोन टक्के तर निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी रियल्टी आणि निफ्टी ग्राहकोपयोगी वस्तूंचा निर्देशांक एक टक्का वाढले. त्याचवेळी निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फार्मा अर्धा टक्का घसरले.
आज निफ्टीच्या ५० मुख्य शेअरपैकी ३६चे भाव वाढले. तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २० शेअरचे भाव वाढले. हिरो मोटर कॉर्प आज १५७ रुपयांनी वाढून त्याच्या वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे ५,०४३ रुपयांवर गेला. या शेअरच्या भावातील ही सलग पाचवी तेजी आहे. तर युरोपीय ग्राहकांच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्याने कोचिंग शिपयार्डदेखील आज नऊ टक्के वाढला होता.
आज ‘बीएसई’वर नेसले, टीसीएस, ॲक्सिस बँक एक टक्का घसरले. तर आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट या शेअरचे भाव अर्धा टक्क्यांच्या आसपास घसरले. दुसरीकडे महिंद्र आणि महिंद्र पावणेचार टक्के वाढला, एल अँड टी आणि जेएसडब्ल्यू स्टील अडीच टक्के वाढले, तर एनटीपीसी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, स्टेट बँक, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, टेक महिंद्र या शेअरचे भाव एक टक्का वाढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com