प्रसिद्ध देवा ग्रुपचा विकासकामांना पाठिंबा

प्रसिद्ध देवा ग्रुपचा विकासकामांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : सामाजिक कार्यात स्थान मिळवलेल्या देवा ग्रुप संघटनेने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मुरबाड येथील सभेत ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले आणि सचिव तानाजी मोरे यांनी महायुतीला पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच, महायुतीच्या प्रचारात सामील होऊन महाविजय साकारणार असल्याची ग्वाही दिली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देवा ग्रुपच्या उमेदवाराने २० हजारांहून अधिक मते मिळवली होती. मुरबाड येथे झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवा ग्रुपला सामाजिक क्षेत्रात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष सुजित ऊर्फ पप्या ढोले आणि सचिव तानाजी मोरे यांनी कपिल पाटील यांना पाठिंब्याचे पत्र दिले. या वेळी भाजपचे आमदार किसन कथोरे यांचीही उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला पाठिंबा म्हणून महायुतीच्या पाठीशी उभे राहणार आहोत, अशी भूमिका ढोले यांनी व्यक्त केली. या वेळी संघटनेचे संदीप ठाकरे, नितेश कासार, ज्ञानेश्वर शिर्के, कैलास तुंबडा, रूपेश जाधव, परेश कासार, मुरबाड तालुकाध्यक्ष चेतन मोरे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com