डहाणूत आमदार निकोले मतदारांच्या भेटीला

डहाणूत आमदार निकोले मतदारांच्या भेटीला

डहाणूत आमदार निकोले मतदारांच्या भेटीला

कासा, ता. १४ (बातमीदार) : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार ग्रामीण भागातसुद्धा रंगत आहे. पालघर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी तर महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. गेल्या दोन ते चार दिवसांपासून ग्रामीण परिसरात प्रचार जोरदार रंगत आहे. निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षाचे प्रमुख नेते ग्रामीण भागात प्रचारात व्यस्त झाले आहेत. १४ रोजी डहाणूमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरू असतानाच आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डहाणू बाजारपेठेत प्रचार करत होते. स्वतः आमदार निकोले यांनी डहाणूतील अनेक दुकानदारांची भेट घेत महायुतीच्या भारती कामडी यांनाच मत देण्याचे आवाहन करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com