मुंबईतील सर्व वॉर्डातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा

मुंबईतील सर्व वॉर्डातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा

सर्व वॉर्डांतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा
मुंबई महापालिका आयुक्तांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी पालिकेची परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. घाटकोपर येथील छेडानगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली त्या ठिकाणी आयुक्त गगराणी यांनी आज भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतानाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
गगराणी म्हणाले की, पालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडा नगर येथील दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेले अन्य तीन अनधिकृत होर्डिंगवरदेखील तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
...
होर्डिंगसाठी परवानगी बंधनकारक
जमीन मालकी कोणाचीही असली, तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोहमार्ग पोलिस आयुक्तांच्या जागेतील अनधिकृत जाहिरात फलक तसेच परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही आयुक्त भूषण गगराणी यांनी अधोरेखित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com