दिव्यांग मंत्रालयाचे स्वप्न पूर्ण : बच्चू कडू

दिव्यांग मंत्रालयाचे स्वप्न पूर्ण : बच्चू कडू

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्रीपद असताना केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारले. दिव्यांगांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांगांच्या स्वप्नाची पूर्तता केल्याने त्यांचे आपल्यावर ऋण आहेत, असेही कडू म्हणाले. उल्हासनगर ४ येथील स्वामी शांती प्रकाश हॉल येथील मेळाव्यात कडू यांनी माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल असले, तरी ते सर्वसामान्यांसाठी लढलो म्हणून आहेत. कधीही गुंडागर्दी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक संपल्यावर मी उपोषणाला बसतो. मग बघू सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करत नाही, असा इशाराही कडू यांनी दिला. या वेळी ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, संपर्कप्रमुख हितेश जाधव, शहरप्रमुख प्रधान पाटील, पदाधिकारी बाळकृष्ण पाटील, श्याम भोईर, दीपक लढे, अविनाश सोनवणे, आलम खान, वसंत पानसरे, विजय मढवी, रक्षक म्हात्रे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com