मुख्यमंत्री आज डोंबिवलीत

मुख्यमंत्री आज डोंबिवलीत

कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होण्यासाठी गुरुवारी (ता. १६) येणार आहेत. डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून, या वेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी असलेले डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. मात्र, आता निवडणूक चार दिवसांवर आल्याने मुख्यमंत्री स्वत: प्रचारासाठी डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला सुरुवात होईल. यानंतर डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण असा चार किमीचे मार्गक्रमण करून आजदे गावात रॅलीचा समारोप होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com