आर. आर. एज्युकेशनल ट्रस्टला नॅकची मान्यता

आर. आर. एज्युकेशनल ट्रस्टला नॅकची मान्यता

मुलुंड (बातमीदार) : मुलुंड पूर्वेतील आर. आर. एज्युकेशनल ट्रस्टच्या बीएड कॉलेजला नॅकची मान्यता देण्यात आली आहे. ही प्रतिष्ठित कामगिरी शिक्षणातील उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेची पुष्टी करते, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंह यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. अजय भामरे आणि डी.ए.व्ही. कॉलेजचे संचालक महेश कपूर यांचे यावेळी डॉ. सिंह यांनी आभार मानले. यावेळी मार्गदर्शक डॉ. सुनीता मगरे, डॉ. रेनी फ्रान्सिस आणि डॉ. अंकुश औंधकर आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. फाल्गुनी अनिश शहा, चित्रा खेडेकर, आदिती तावरे आणि शिक्षकांच्या टीमच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले. ही मान्यता दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांना प्रमाणित करते, असे वक्तव्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. सिंह यांनी केले.
…..
‘गुन्हेगारी टाळण्यासाठी परप्रांतीय सलून कारागीरांची ओळख निश्चित करावी’
प्रभादेवी (बातमीदार) : असंघटित परप्रांतीय सलून कारागीरामुळे सलून व्यवसायात होणारी गुन्हेगारी टाळण्यासाठी त्यांच्याकडून पुरावे गोळा करून ओळख निश्चित करणे गरजेचे आहे, अशी मागणी सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने केली आहे. सलून व्यवसायातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी परप्रांतीय सलून व्यावसायिकांची चौकशी करावी आणि त्यांना पुरावे जमा करण्यास सांगण्यात यावे. ज्यामुळे सलून व्यवसाय करणारे सुरक्षित होतील, अशा मागणीचे पत्र पोलिस महासंचालकांना आणि पालिकेला देण्यात आल्याचे सलून ब्युटीपार्लर असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
आधीच हा व्यवसाय असंघटित आहे. त्यातच या व्यवसायाच्या नावाखाली अनैतिक प्रकार काही व्यावसायिक करतात. एकसमान दर न घेणे, बाजूबाजूला दुकान सुरू करणे, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन हाणामारी घडू शकते, असे असोसिएशनच्या निदर्शनास आल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
……

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com