कर्जतमधील जंगलात आढळला मानवी सांगडा

कर्जतमधील जंगलात आढळला मानवी सांगडा

कर्जतमधील जंगलात आढळला मानवी सांगडा
घातपाताचा संशय; ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान

नेरळ, ता. १५ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील शिलारवाडी जंगलातील गोंडाला भागात बेवारस मानवी सांगाडा आढळून आला आहे. गावातील नागरिकांना हा मृतदेह वजा सांगाडा दिसल्यानंतर पोलिस पाटील आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. हा सांगाडा अर्धवट अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जतमधील शिलारवाडीतील जंगलात अर्धवट अवस्थेतील मृतदेह वजा सांगाडा नागरिकांना आढळून आला. त्यानंतर धोत्रे गावचे पोलिस पाटील मनोज रसाळ, शिलार गावचे पोलिस पाटील जनार्दन रनावरे यांनी याची माहिती कर्जत पोलिसांना दिली. या व्यक्तीचा अनेक दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सापडलेल्या सांगाड्याचे अंदाजे वय ३० ते ३५ सांगितले जात आहे. प्रेताजवळ भगव्या रंगाचा टी-र्शट असून शरीराच्या अर्ध्याच भागाचे अवयव घटनास्थळी आढळून आले. त्यानंतर ते अवयव कशेळे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
दरम्यान, हा मृतदेह जंगलात पुरलेला असताना जंगली प्राण्यांनी तो बाहेर काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे. या मृतदेहाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडल्याचेही पोलिसांनी सांगितले. संबंधित व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असून आपल्या परिसरात एखादी व्यक्ती हरवली असेल तर कशेळे, कर्जत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com