मतदानाच्या दिवशी सुट्टी वा सवलत मिळणार

मतदानाच्या दिवशी सुट्टी वा सवलत मिळणार

पालघर, ता. १५ : पालघरसह राज्यातील इतर १२ मतदारसंघात सोमवारी (ता. २०) पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सरकारने राज्यात आणि सीमेलगतच्या भागातील मतदान क्षेत्रातील मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी देण्याचे; तसेच अपवादात्मक परिस्थितीत किंवा ज्यांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशी परिस्थिती असलेल्या विभागातील कामगार, अधिकारी, कर्मचारी मतदारांना सवलत जाहीर केली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अशांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com