फुकट्या प्रवाशांकडून १७३.८९ कोटींचा दंड वसूल

फुकट्या प्रवाशांकडून १७३.८९ कोटींचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १७३.८९ कोटी रुपयांच्या विक्रमी तिकीट तपासणी महसूल गोळा करून मागील सर्व विक्रम मोडले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वकृष्ट काम करणाऱ्या २३ गुणवंत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा सत्कार पश्चिम रेल्वेने केला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण १७३.८९ कोटी रुपयांचा तिकीट तपासणी महसूल गोळा करून मागील सर्व विक्रम मोडले आहेत. पश्चिम रेल्वेला रेल्वे बोर्डाने दिलेले आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार केले आहे. तसेच निर्धारित लक्ष्यापेक्षा २३.९० टक्क्यांची वाढ तिकीट तपासणी महसुलात नोंदवली. पश्चिम रेल्वेच्या दोन हजार २८६ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांपैकी १७ कर्मचाऱ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात सर्वोच्च कामगिरी नोंदवली. यात सहा महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक तरुण जैन यांनी अलीकडेच चर्चगेट येथील सहा विभाग आणि मुख्यालयाच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या या २३ फ्लाइंग स्क्वॉड कर्मचाऱ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com