अर्थ - निर्देशांकांमध्ये घसरण

अर्थ - निर्देशांकांमध्ये घसरण

निर्देशांकांमध्ये घसरण
सेन्सेक्स ११७ अंश घसरला
मुंबई, ता. १५ : नफावसुलीमुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांमध्ये घसरण झाली आणि तीन दिवसांची तेजीची मालिका संपुष्टात आली. आज सेन्सेक्स ११७.५ अंश, तर निफ्टी १७.३० अंश घसरला. सेन्सेक्स ७३ हजारांच्या खाली बंद झाला.
आज पहिल्या तासाभरात सेन्सेक्सची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्सने ७३,३०० चा टप्पाही गाठला होता, मात्र नंतर तेथून त्याच्यात मोठी घसरण आली आणि नंतर त्या घसरणीतून सेन्सेक्स सावरलाच नाही. त्याने ७३ हजारांचा स्तर खालच्या दिशेने तोडला व दिवसअखेर सेन्सेक्स ७२,९८७.०३ अंशांवर, तर निफ्टी २२,२००.५५ अंशांवर स्थिरावला.
आज बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक पाऊण ते एक टक्का वाढले; तर सरकारी बँकांचा निर्देशांक दीड टक्का वाढला. बांधकाम व्यवसाय आणि ऑईल अँड गॅस निर्देशांक एक टक्का वाढले; तर निफ्टी एफएमसीजी निर्देशांक एक टक्का आणि निफ्टी ऑटो निर्देशांक अर्धा टक्का घसरला. महिंद्र आणि महिंद्र विक्रमी उंचीवर म्हणजे २,३०२ रुपयांवर गेला; तर तिमाही निकाल चांगले आल्यामुळे सिमेन्स आणि ओबेराय रिअल्टीचे शेअर वाढले. प्रवर्तकांनी आपला अडीच टक्के वाटा विकल्यामुळे सिप्लाचा शेअर घसरला.
आज बीएसईवर एशियन पेंट व टाटा मोटर दोन टक्के घसरले. एचडीएफसी बँक दीड टक्का घसरला, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलीव्हर एक टक्का घसरले; तर नेस्ले आणि टायटन या शेअरचे भावही घसरले. दुसरीकडे एअरटेल आणि पॉवरग्रीड दोन टक्का वाढले. एनटीपीसी तसेच महिंद्र आणि महिंद्र दीड टक्का, एचसीएल टेक व लार्सन अँड टुब्रो एक टक्का वाढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com