

डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : कर्करोगासंदर्भातील माहिती रुग्णांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, तसेच रुग्ण आणि नातेवाईकांच्या मनात विश्वास, उमेद निर्माण व्हावी, यासाठी ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. ठाण्यातील तीन हात नाका येथे हे केंद्र सुरू आहे. शहरातील आधाररेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. ठाणे शहरातील आधाररेखा प्रतिष्ठान मागील ११ वर्षे कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे. ठाण्यातील रश्मी जोशी यांचे पती अरविंद जोशी हे कर्करोगग्रस्त होते. त्यामुळे कर्करुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचणी, वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. हा त्रास इतर रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना होऊ नये, यासाठी जोशी दाम्पत्याने २०१३ मध्ये आधाररेखा प्रतिष्ठानची स्थापना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.