वज्रेश्वरी शिरसाड मार्गांवर गॅस वाहिनी टाकणाऱ्या ठेकेदाराची मनमानी

वज्रेश्वरी शिरसाड मार्गांवर  गॅस वाहिनी टाकणाऱ्या ठेकेदाराची मनमानी
Published on

वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी बांधकाम उपविभागाअंतर्गत भिवंडी-वाडा रस्ता व अंबाडी वज्रेश्वरी ते शिरसाड रस्ता येथे गुजरात गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र ठेकदाराने शेतकऱ्यांना विश्वासात मनमानीपणे काम सुरू केले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असून या कामाची त्वरित चौकशी व्हावी, तसेच ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी गणेशपुरी ग्रामपंचायतने केली आहे.

अंबाडी-शिरसाड या मार्गांवर गुजरात गॅस वाहिनीच्या कामाचा ठेका रुद्रा या कंपनीला देण्यात आला आहे; मात्र या ठेकेदार कंपनीने स्थानिक ग्रामपंचायत तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच जबरदस्तीने काम सुरू केले आहे. रस्त्याच्या बाजूला ज्यांच्या जमिनी आहेत. त्या शेतकऱ्यांना न विचारताच खोदकाम सुरू केले आहे. नुकतेच गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील हर घर जल योजनेची वाहिनी उखडून टाकली आहे. तसेच, वज्रेश्वरी प्रदेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे देखील नुकसान केले आहे. या मार्गांवर कन्या विद्यालय, वसतिगृह, शाळा, महाविद्यालय, तसेच देवस्थानदेखील रस्त्याच्या बाजूला आहे. दरम्यान हे काम करत असताना मुख्य रस्त्यावर माती टाकली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत.

परवानगीनुसार गॅसवाहिनी रस्त्यापासून १५ मीटर अंतरावर टाकायची आहे; परंतु या कंपनीने ७ मीटर अंतरावरच खोदकाम करून गॅसवाहिनी टाकली आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कंपनीवर अद्यापही कारवाई केलेली नाही. याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com