

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्यावेळी सोमवारी (ता. २०) मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात (डिलीट) आल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्यामुळे ते हक्कापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे वगळण्यात आलेली नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
मिरा-भाईंदरमधील मिरा-भाईंदर आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याची पूर्वकल्पना नसल्याने मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांना मनस्ताप सोसावा लागला. वर्षानुवर्षे मतदान करत असल्याने मतदार नेहमीच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचले, मात्र त्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. नावे अचानक वगळली गेल्याबद्दल त्यांना धक्काच बसला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अशा मतदारांना अर्ज क्र. १७ भरून मतपत्रिकेद्वारे मतदान करता येते, मात्र मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करू दिले नाही. त्यामुळे हे मतदार मतदान न करताच परतले, असा दावा व्यास यांनी केला.
मिरा-भाईंदरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. मतदान करता न आल्याने मतदारांच्या हक्काचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन दोन्ही मतदारसंघातील वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावीत.
- ॲड. रवी व्यास,
प्रमुख, मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.