जलवाहिनीत आढळला मृत कबुतर

जलवाहिनीत आढळला मृत कबुतर
Published on

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : जलवाहिनीत मृत कबुतर सापडल्याची घटना घडली असून नागरिक याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ३० मल्हारनगर येथील सुयोग सोसायटी व स्नेहांकित मित्र मंडळ परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी येत नव्हते. याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी शनिवारी केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. २१) महापालिका कर्मचाऱ्यांनी याठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. तेव्हा जलवाहिनीत मृत कबुतर आढळून आले.

सध्या कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाणीपातळी खालावली आहे. अनेक भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यातच जलवाहिनीत मृत कबुतर आढळून आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी कल्याणमध्ये स्मार्ट पाणी विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. पाणी विभागाने वेळच्यावेळी जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी केली आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com