

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल आज (ता. २१) जाहीर करण्यात आला. या निकालात ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलींचाच बोलबाला पाहायला मिळाला. ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.८ टक्के इतका लागला असून यात ९४.०७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला ९७ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८९ हजार ९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या ८९ हजार ९३५ विद्यार्थ्यांमध्ये ४५ हजार ६५५ मुले आणि ४४ हजार २८० मुलींचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. मुरबाडमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्के आहे. मुरबाड तालुक्यात एक हजार ९६५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी एक हजार ९२६ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यात ९३९ मुलांचा; तर ९८७ मुलींचा समावेश आहे.
दरम्यान, यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९७.०५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेतून ३९ हजार ३१ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ८८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर वाणिज्य शाखेचा निकाल ९१.३४ टक्के लागला असून या शाखेतून ४५ हजार ११९ विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर कला शाखेचा निकाल ७९.३९ टक्के लागला आहे. या शाखेतून १२ हजार ६६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १० हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुकानिहाय निकाल
क्षेत्र टक्केवारी
कल्याण ग्रामीण ९६.०५
अंबरनाथ ९२.४९
भिवंडी ८९.१८
मुरबाड ९८.०१
शहापूर ९२.८०
ठाणे मनपा ९२.४१
नवी मुंबई ९३.७०
मिरा भाईंदर ९३.४९
कल्याण डोंबिवली ९०.१२
उल्हासनगर ९०.८०
भिवंडी मनपा ९१.६०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.