बुलेट ट्रेनच्या कामाला गती

बुलेट ट्रेनच्या कामाला गती
Published on

बुलेट ट्रेनच्या कामाला गती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटादरम्यान २१ किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येत आहे. एकूण लांबीपैकी १६ किलोमीटरचे खोदकाम तीन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)द्वारे केले जाणार असून उर्वरित पाच किलोमीटरचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून केले जाणार आहे.

टीबीएमसह १६ किलोमीटरचा हा भाग बांधण्यासाठी ७६ हजार ९४० सेगमेंटचा वापर करत सात हजार ४४१ रिंग तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यासाठी विशेष रिंग सेगमेंट टाकण्यात येत आहेत, प्रत्येक रिंगमध्ये नऊ वक्र विभाग आणि एक मुख्य विभाग आहे, प्रत्येक विभाग दोन मीटर रुंद आणि ०.५ मीटर जाडीचा आहे. सोबतच यासाठी उच्च संरचनात्मक अखंडता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी हाय-स्ट्रेंथ एम ७० ग्रेड काँक्रीटचा वापर केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील महापे येथे ९८ हजार ८९८ चौरस मीटर (९.९ हेक्टर) क्षेत्रफळाचे कास्टिंग अँड स्टॅकिंग यार्ड सध्या सुरू करण्यात येत आहे. या यार्डात साच्यांचे नऊ संच असतील, या संचात प्रत्येकी दहा तुकडे असतील. या साच्यांचे चार संच यापूर्वीच प्रकल्पस्थळी बसविण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com