

नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढा
पालिकेचे आकडे हे रतन खत्रीचे आकडे असल्याची शेलार यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील नालेसफाईचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा हा दावा खोटा आहे. नालेसफाईच्या कामाबाबत असमाधानी आहोत. नालेसफाईचे आकडे हे रतन खत्रीचे आकडे असल्याची टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली. पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाची पाहणी करावी, असे आवाहन शेलार यांनी करत या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.
आशीष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझधर बांध जंक्शन, साऊथ अॅव्हेन्यू, नाँर्थ अॅव्हेन्यू, एसएनडीटी नाला येथील नालेसफाई कामाची पाहणी केली. अद्याप समाधानकारक कामे झालेली नाहीत, हे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मुंबई शहरात मोठे-छोटे अरुंद असे दोन हजार किलोमीटर नाले आहेत. नालेसफाईला गेल्यावर्षीच्या अनुभवाच्या आधारे अडीचशे कोटींच्यावर खर्च होतो; पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते? अडीचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होऊन दोन हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई समाधानकारक नाही. मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या पद्धतीचा कामाचा प्रतिसाद दिसता पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई होईल, हे अशक्यप्राय वाटत आहे. महापालिका आयुक्त आपण नाल्यावर या, नालेसफाईच्या कामाच्या भेटीचे चित्र दिसू द्या, अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या पद्धतीचे आकडे फेकले जात आहेत, ते पाहता नाल्यांची ७५ टक्के सफाई झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र ४० ते ४५ टक्के नालेसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्याचे शेलार म्हणाले.
..
नालेसफाई आकडे म्हणजे रतन खत्रीचे आकडे
जुन्या काळात मटका किंग रतन खत्रीचे आकडे होते, तसे महापालिकेचे आकडे आहेत. दोन लाख ७३ हजार मॅट्रिक टन गाळ कुठे टाकला, व्हिडीओ दाखवा? क्षेपणभूमी कुठे आहे? प्रमाणपत्र दाखवा, जिथून गाळ काढला त्या भागातल्या आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतली का? कंत्राटदारांनी दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्याच्यामध्ये ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या पद्धतीचा प्रकार आहे, अशीही टीका आशीष शेलार यांनी केली.
..
‘गाळाचे मोजमाप करण्यासाठी मापदंड ठरवा’
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्याचे गाळ मोजण्याचे परिमाण होते ते अजब होते. गाळ काढायचा तर पावसानंतर सोबतच त्याची टक्केवारीही ठरलेली होती. त्यामुळे नाल्याच्या कचऱ्याचे मोजमाप करणारा, साफसफाईचा परिमाण ठरवणारा नवा मापदंड पालिकेने करावा, अशी मागणीही आशीष शेलार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.