अर्थ - निफ्टी बँक इंडेक्स फंड

अर्थ - निफ्टी बँक इंडेक्स फंड
Published on

डीएसपी म्युच्युअल फंडातर्फे
निफ्टी बँक इंडेक्स फंड
मुंबई, ता. २१ : निफ्टी बँक निर्देशांकाचा मागोवा घेणारी ‘डीएसपी निफ्टी बँक इंडेक्स फंड’ ही योजना डीएसपी म्युचुअल फंडाने सुरू केली आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना सर्वाधिक रोख तरलता असलेल्या बारा बड्या भारतीय बँक समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मिश्रणातून या फंडाची रचना करण्यात आली आहे. निफ्टी ५० निर्देशांकांच्या तुलनेत निफ्टी बँक निर्देशांकाने उत्तम दीर्घकालीन परतावा दिला आहे. जानेवारी २००० पासून निफ्टी निर्देशांकांच्या तुलनेत निफ्टी बँक निर्देशांक ६७ पटीने वाढला आहे; मात्र गेल्या पाच वर्षांत या दोन्ही निर्देशांकांची कामगिरी पाहता निफ्टीच्या तुलनेत निफ्टी बँक निर्देशांकांची कामगिरी निराशाजनक आहे. मात्र त्यामुळे क्षेत्रनिहाय मूल्यांकनाच्या तुलनेत बँक निफ्टी निर्देशांक सध्या उत्तम स्थानी आहे. त्यामुळे आगामी क्षेत्रातील बँकिंग क्षेत्राची वाढ लक्षात घेता गुंतवणूकदारांना त्यात प्रवेशाची आकर्षक संधी आहे, असे डीएसपी म्युच्युअल फंडाचे अनिल घेलानी म्हणाले. या फंडात २७ मेपर्यंत गुंतवणूक करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com