

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण मिळाले नसल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदर पूर्वेत घडला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
भाईंदर पूर्वेतील एका विद्यार्थिनीने बारावीच्या निकालात कमी गुण मिळाल्याने मंगळवारी (ता. २१) दुपारी घरात कोणीही नसताना नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.