

मुंबईत विजेच्या मागणीत विक्रमी वाढ
दुपारी सव्वातीन वाजता ४,३०७ मेगावॉटची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : तापमानाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबईकर पुरते बेहाल झाले आहेत. परिणामी एसी, पंखे, कुलर अशा विद्युत उपकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मंगळवारी (ता. २१) दुपारी सव्वातीन वाजता मुंबईची विजेची मागणी तब्बल ४,३०७ मेगावॉट एवढी नोंदवली गेली. आतापर्यंतची विजेची ही सर्वाधिक मागणी ठरली.
मुंबईत अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्टकडून वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईच्या विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदवली जात आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या विजेच्या मागणीचा आलेख चढता होता. दुपारी सव्वातीन वाजता ४,३०७ मेगावॉट एवढी मागणी नोंदवली गेली. याआधी ३१ मे रोजी मुंबईची विजेची ३,९०९ मेगावॉट एवढी विक्रमी मागणी नोंदविण्यात आली होती. दरम्यान आजची मुंबईची विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरने १,०३० मेगावॉट, अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू वीज केंद्रातून ५०० मेगावॉट, तर केंद्रीय वीज प्रकल्प आणि पॉवर एक्स्चेंजमधून सुमारे २,७७७ मेगावॉट वीज घेण्यात आली.
वीज कंपनी : ग्राहक संख्या
अदाणी इलेक्ट्रिसिटी : २८ लाख
टाटा पॉवर : ७.५ लाख
बेस्ट : १२ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.