

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
प्रगती, इंटरसिटी, तपोवन एक्स्प्रेस आणि वंदे भारत ट्रेन रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १० व ११च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून बुधवारी (ता. २२) ते शुक्रवारी (ता. २४) पर्यंत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी - विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि वंदे भारत ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवार, १ जून २०२४ पर्यंत दररोज रात्री विशेष ब्लॉक असणार आहे.
...
स्थानक - सीएसएमटी ते भायखळा
मार्ग : अप धीमा, अप-डाऊन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका
वेळ : रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत (रोज रात्री ४ तास)
...
२२ ते ३१ मेदरम्यान बाधित होणाऱ्या लोकल-मेल/एक्स्प्रेस
मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम
- सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल
- कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल
- सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल
- ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल
- ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल
................
२८ ते ३१ मेदरम्यान या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द
सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या रद्द असणार आहेत.
..........
दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत
------------
पनवेल, ठाणे स्थानकात रद्द
अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणेपर्यंत चालविण्यात येणार आहे; तर मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.
---------
दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या
सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या दादर; तर सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलमधून सुटणार आहे.
..
प्रवाशांना रेल्वेचे आवाहन
विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, प्रगती एक्स्प्रेस चार दिवस रद्द राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, बुधवारीपासून (ता. २२) मे महिनाअखेरपर्यंत पनवेलहून धावणार आहे. यामुळे सीएसएमटीहून रात्रीच्या वेळेस मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांचे वेळापत्रक आणि बदल पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.