थायलंडमध्यश संयुक्त राष्ट्र काॅन्सिलचा वैशाख महोत्सव

थायलंडमध्यश संयुक्त राष्ट्र काॅन्सिलचा वैशाख महोत्सव

घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) : थायलंड बॅंकाक येथे १९ वा संयुक्त राष्ट्र काॅन्सिलचा वैशाख महोत्सव १९ आणि २० मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाला मुंबईमधून बौद्ध धर्मगुरू भिक्खू विरत्न महाथेरो यांची उपस्थिती होती. जागतिकस्तरीय हा महोत्सव असून २०० देशाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
बुद्ध भगवंतांना जन्म, ज्ञान व महापरीनिर्वाण लाभ झाला आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने १९९९ मध्ये आमसभेत तीन दिवस वैशाख महोत्सव आणि संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून मान्यता दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर न्युयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य कार्यालयात २००१ मध्ये वैशाख महोत्सव साजरा करण्यात आला होता. इंटरनॅशनल काॅन्सिल फाॅर वैशाख दिवस ज्याला युनायटेड नॅशन इकॉनाॅमिक आणि सोशल काॅन्सिल सहसल्लागार दर्जा आहे. महाचुलालोंगकोर्नराजा विद्यालय विद्यापीठचे ऑडोटोरियम हाॅल, बॅंकाकमधील संयुक्त राष्ट्र परिषद केंद्र, महामुकूट बौद्ध विद्यापीठ, थायलंडमधील सांस्कृतिक मंत्रालयाच्या धार्मिक व्यवहार विभाग आणि बौद्ध धर्मांचे राष्ट्रीय कार्यालय यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आयोजक होते. या सोहळ्यासाठी मुंबई येथून भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू विरत्न महाथेरो यांना निमंत्रित करण्यात आले होते. यात २०० देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाथेरो हे अखिल भारतीय भिक्खू संघांचे कार्यकारी सदस्य असून, गव्हर्नर बाॅडीमधील ११ प्रमुख सदस्यांपैकी आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे सचिव असून मुंबई प्रदेश भिक्खू संघाचेही अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या वतीने नुकतेच थायलंड येथे भगवान बुद्ध व सारीपुत्त, मोग्गलायन या अर्हत भन्तेच्या पवित्र शरीर (अस्थी) धातू घेऊन गेले होते. अखिल भारतीय भिक्खू संघ व भारत सरकारच्या बौद्ध शिष्य मंडाळात त्यांनी २८ फेबुवारी ते १० मार्चदरम्यान चीन, बांगलादेश, तायवान, नेपाळ आदी देशांत दौरे केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com