महिला-पुरुष मतदानात केवळ दीड टक्क्यांचा फरक

महिला-पुरुष मतदानात केवळ दीड टक्क्यांचा फरक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील महिला पुरुषांच्या तोडीस तोड काम करतात. नोकरदार महिलांपासून, मनोरंजनापासून ते बिझनेस क्षेत्रातही महिलांचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. यंदा मुंबईत पुरुषांची मतदार संख्या ५३ लाख; तर महिलांची संख्या ४५ लाख आहे. एकूण आकड्यात लाखांची तफावत असूनही मतदानात केवळ दीड टक्क्यांचा फरक आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघात एकूण ५३.९७ टक्के मतदान झाले आहे. एकूण पुरुषांच्या तुलनेत ५४.७१ टक्के मतदान केले आहे; तर एकूण महिला मतदारांच्या तुलनेत महिलांनी ५३.२८ टक्के मतदान झाले; तर तृतीयपंथीचे ३९.९९ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण मुंबईत महिला मतदारांचे प्रमाण जास्त असून पुरुष आणि महिला मतदारांमध्ये ०.८ टक्क्यांचे अंतर आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ४३.६८ टक्के मतदान झाले असले, तरी महिला मतदारांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा तीन टक्के जास्त आहे. पुरुषांचे मतदान ४२.७० टक्के; तर महिलांचे ४५.७१ टक्के मतदान झाले. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात पुरुषांचे ५०.४० टक्के; तर ५०.५८ टक्के मतदान झाले असून महिला मतदान ०.१८ टक्के जास्त आहे. अणुशक्ती नगरमध्ये पुरुषांचे ५४.१२; तर महिलांचे ५४.२६ टक्के मतदान झाले आहे.
---
लोकसभा मतदान टक्केवारी २०२४
विधानसभा पुरुष - महिला -- इतर --एकूण
उत्तर मुंबई
बोरिवली - - ६४.५० --६०.७९--१००--६२.५०
दहिसर - - ५८.५५---५७.६६--१३.३३--५८.१२
मागाठाणे - ५६.५७--५४.५६---५०--५५.६६
कांदिवली - ५५.५६--५३.५०--३३.३३---५४.३८
चारकोप - ५८.५१---५७.०३--६०.६७--५७.८३
मालाड पश्चिम - ५३.९८--५३.०८--३०.८२--५३.५२
एकूण--५७.८३-५६.१२--४०.७७--५७.०२
-----
उत्तर पश्चिम
जोगेश्वरी पूर्व - ५८.३७--५५.७०--८०.००--५७.११
दिंडोशी - ५५.७१--५३.५२--५३.८५--५४.७७
गोरेगाव - ५५.९०--५३.७५--३८.४६--४४.५३
वर्सोवा -५३.२२--५३.०६--०--५३.५०
अंधेरी प -५४.०७--५३.२०--२८.२७--५३.६५
अंधेरी पू - ५६.६१--५४.७१--२०.००--५४.७३
एकूण-५५.५५--५४.०१--४८.३३-५४.८४
----
उत्तर पूर्व
मुलुंड -६२.९५--५९.६४--५२.७०--६१.३३
विक्रोळी - ५६.५८--५२.०८--१००--५४.४५
भांडुप प. - ६०.५९--५६.१०--५०.६३--५८.५३
घाटकोपर प. - ५७.८७--५३.६४--३३.३३--५५.९०
घाटकोपर पू. - ५८.९४--५६.६४--३८.१०--५७.८५
मानखुर्द शिवाजीनगर - ५०.४०--५०.५८--६९.२३--५०.४८
एकूण--५७.६७--५४.८८--३९.४१--५६.३७
---
उत्तर मध्य
विलेपार्ले -५६.८२--५५.३०--०--५६.०१
चांदिवली - ४९.५७--४८.८७--२६.६७--४९.४३
कुर्ला -५२.४४---५१.८०--५४.५५--५१.८६
कलिना -५२ .४८--५०.५५--७२.७३--५१.५८
वांद्रे पू. - ५३.८५--५०.३९--१०.५३--५२.२४
वांद्रे प. - ५१.४८--४२.५३--३३.३३--५२.७०
एकूण - ५२.५४--५१.३१--३५.३८--५१.९८
-------
दक्षिण मुंबई
वरळी - ५०.४०--५०.२१--५०.००--५०.३२
शिवडी - ५२.६७--५०.९२--८०.००--५१.८६
भायखळा - ५३..३०--५२.२५--४०.२९--५२.७२
मलबार हिल -५२.३४--५१.५०--४५.४५--५१.७७
मुंबादेवी -५०.५२--४९.४७--५०.००--५०.०४
कुलाबा -४२ .७०--४५ .७१--२५.०० -४३.६८
एकूण -५०.१०--५०.०२--४१.८६-५०.०६
------
दक्षिण मध्य मुंबई
अणुशक्ती नगर -५४.१२--५४.२६--६२.५०--५४.२८
चेंबूर -५४.४७--५२.३८--५५.५६--५३.४८
धारावी -४८.७७--४८.२८--४३.२४--४८.५२
शीव कोळीवाडा -५२.२५--५०.४८--२०.७८--५१.६३
वडाळा -५८.६०--५५.५२--००--५७.११
माहीम -५९.२२--५६.७२--२९.२३--५६.९७
एकूण -५४.७०-५२.९६-३४.२३--५३.६०
---
मुंबईतील एकूण मतदान टक्केवारी
पुरुष --५४.७१
महिला -५३.२८
इतर- ३९.९९
एकूण---५३.९७
---
मुंबई शहर मतदारांची माहिती
एकूण मतदार :- २४ लाख ९० हजार २३८
एकूण पुरुषः- १३ लाख ४३ हजार ९६९
एकूण स्त्री:- ११ लाख ४६ हजार ०४५
एकूण तृतीयपंथीः- २२४
---
मुंबई उपनगरातील मतदारांची माहिती
एकूण मतदार :- ७४ लाख ४८ हजार ३८३
एकूण पुरुषः- ४० लाख २ हजार ७४९
एकूण स्त्री:- ३४ लाख ४४ हजार ८१९
एकूण तृतीयपंथीः- ८१५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com