दुचाकी धडकेत तिघे पोलिस जखमी

दुचाकी धडकेत तिघे पोलिस जखमी

रोहा, ता. २३ (बातमीदार)ः समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिल्याने तिघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी शरद कोटकर व याकूब तडवी बुधवारी (ता. २२) रात्री सागर कवच अभियानांअंतर्गत त्यांच्या शासकीय दुचाकीवरून (क्रमांक एमएम ०६ सीएफ ९६३४) वरून गोफण परिसरात गस्त घालत असताना रात्री आठ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एमएच ०६ बीएस ३७७५) वरून आलेल्या नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दयानंद ठाकूर यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिस कर्मचारी याकूब तडवीला जबर मार लागला आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईत हलवण्यात आले आहे. तर शरद कोटकर व दयानंद ठाकूर यांच्यावर रोह्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com