मध्य रेल्वेने तिकीट दलालांवर कारवाई

मध्य रेल्वेने तिकीट दलालांवर कारवाई

मध्य रेल्वेची तिकीट दलालांवर कारवाई
एका महिन्यात २१ जणांना अटक; साडेतेरा लाखांची तिकिटे जप्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तिकीट दलालांवर मध्य रेल्वेच्या आरपीएफने कडक कारवाई केली आहे. एक महिन्यात तिकीट दलालांविरुद्ध दाखल केलेल्या २७ गुन्ह्यांमध्ये २१ जणांना अटक केली आहे, तर त्यांच्याकडून साडेतेरा लाख रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत.
उन्हाळी सुटीत गावी, फिरायला जाण्यासाठी किफायतशीर, आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी नागरिक रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. मेल-एक्स्प्रेसचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी नागरिक सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर रांगा लावतात; परंतु आरक्षण खिडकी उघडताच आरक्षित तिकिटे संपतात. त्यामुळे प्रवाशांना वेटिंगचे तिकीट घ्यावे लागते. वेटिंगचे तिकीट कन्फर्म होत नसल्याने प्रवासी आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रवाशांच्या याच अडचणींचा फायदा तिकीट दलाल घेतात. प्रवाशांना जादा पैसे मोजून आरक्षित तिकीट देतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक फसवणूक होते. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेच्या आरपीएफने कडक कारवाई केली. एप्रिल २०२४ मध्ये आरपीएफ पोलिसांनी रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत दलालीविरुद्ध २७ प्रकरणे नोंदवली. या कायद्यांतर्गत २१ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ४५२ तिकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १३ लाख ५५ हजार १०७ रुपये आहे. या गुन्हेगारांकडून रोख नऊ हजार रुपये जप्त करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com