मारहाणप्रकरणी तृतीय पंथीला जामीन

मारहाणप्रकरणी तृतीय पंथीला जामीन

मारहाणप्रकरणी तृतीयपंथीला जामीन

मुंबई, ता. २३ : ताडी प्यायलेल्या इसमाला भांडणाच्या रागातून मारहाण केल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तृतीयपंथीला मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अर्जदार गेल्या सात महिन्यांपासून तुरुंगात असून आरोपीचे वागणूक पाहता त्याला तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने तृतीयपंथीचा जामीन अर्ज मंजूर केला. सुमित्रा देवेंद्र असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने २० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. गोवंडीच्या शिवाजीनगर येथे १८ सप्टेंबर रोजी अतिक अहमद अन्सारी हा घरी जात असताना त्याचे सुमित्रा देवेंद्र याच्यासोबत भांडण झाले. अतिक याने ताडी प्राशन केली होती. भांडणातून सुमित्राने अतिकला कानाखाली मारले, यात अतिक जमिनीवर पडला व त्याचा मृत्यू झाला होता. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत सुमित्राला अटक केली. जामिनासाठी सुमित्राने ॲड. विशाल खेत्रे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. न्या. एन. जी. शुक्ला यांनी सुमित्राचा जामीन अर्ज अटीशर्तींसह मंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com