Navi Mumbai News: भाजीपाल्याची आवक झाली कमी, दर वाढलें!
Navi Mumbai News: भाजीपाल्याची आवक झाली कमी, दर वाढलें!SAKAL

Navi Mumbai News: भाजीपाल्याची आवक झाली कमी, दर वाढलें!

Navi Mumbai : कडाक्याचे ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाल्‍याने दर चांगलेच वधारले आहेत. अवकाळीने अनेक शेतातील भाजीपाल्‍याचे नुकसान झाले तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हामुळे पालेभाज्या खराब झाल्‍या आहेत.

Navi Mumbai News: भाजीपाल्याची आवक झाली कमी, दर वाढलें!
Navi Mumbai: लसणाचे दर २०० पार, आवक कमी असल्‍याने भाववाढ

Navi Mumbai :सध्या आवक कमी, त्यात भाजीपाला खराब होत असल्यामुळे दर वाढले आहेत. घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात दरातील दर दुपटीने वाढले आहेत. जो पर्यंत उन्हाचा पारा खाली येणार नाही, तोपर्यंत भाजीपाल्याचे दर चढे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

लसूण २५० रुपये किलो


लसूण पुन्हा एकदा २२० ते २५० रुपये किलो झाला आहे. राज्याच्या विविध भागांत होत असलेल्या अवकाळीचा फटका भाजीपाला पिकावर होत आहे, तसेच वातावरण स्वच्छ न राहिल्यामुळे भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. परिणामी, भेंडी, काकडी, टोमॅटो, कोबी यांसह आदी फळभाज्या महागल्या आहेत.

Navi Mumbai News: भाजीपाल्याची आवक झाली कमी, दर वाढलें!
Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन केल्याने पारसिक हिलवर २० वर्षाच्या मुलाने केली 'ती' हत्या

दोन आठवड्यांपासून पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर वाढले आहेत. यात वांगी ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहेत. त्यापाठोपाठ टोमॅटो ५०, कांदे २५ ते ३० रुपये किलोच्या घरात गेले आहेत. मेथी, पालकही २५ ते ३० रुपये जुडीने विक्री होत आहे.

सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. त्यात अवकाळीमुळे भाजीपाल्‍याची आवक कमी होत आहे.
- कैलास ताजने, घाऊक व्यापारी, एपीएमसी

Navi Mumbai News: भाजीपाल्याची आवक झाली कमी, दर वाढलें!
Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com