तोतया सीबीआयचा अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

तोतया सीबीआयचा अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

तोतया सीबीआयचा अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : वनविभागाची ५०० एकर पडीक जमीन नावावर करून देण्याचा प्रलोभनाने दोघांची तब्बल ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्याला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील हनुमंत धुमाळ (वय ४८) असे आरोपीचे नाव असून त्याने वन विभागाचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र तसेच दिंडोशी न्यायालयाची बनावट ऑर्डर देत ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने इतरांचाही फसवणूक केल्याची शक्यता असल्याने त्यानुसार पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
आरोपी सुनील धुमाळ हा सीबीआयच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर चालक म्हणून काम करत होता. याचा फायदा घेत त्याने सीबीआयमध्ये कामाला असल्याचे भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रदेखील तयार केले होते. त्यानंतर या तोतयाने लाल दिव्याच्या गाडीचा वापर करून कोल्हापूर येथील प्रसाद घोरपडे यांच्यासोबत ओळख वाढवून त्यांना ७० ते ८० लाखांत वनविभागाची पडीक जमीन त्यांच्या नावावर करून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. यामध्ये प्रसाद घोरपडे व त्यांचा मित्र प्रसाद जैन यांची आरोपी सुनील धुमाळ याने ८० लाखांची फसवणूक केली. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर सुनील धुमाळविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com