वृद्धेचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

वृद्धेचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : उद्यानातील बाकड्यावर मैत्रिणीसह गप्पा मारत बसलेल्या ७३ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन दोघा लुटारूंनी खेचून पलायन केले. ही घटना वाशी सेक्टर २८ मध्ये गार्डनमध्ये गुरुवारी सायंकाळी घडली. वाशी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तक्रारदार महिला रेखा हरिदास पै (७३) या वाशी सेक्टर २८मध्ये राहण्यास असून त्या दररोज येथील उद्यानामध्ये फिरायला जात असतात. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या सेक्टर २८मधील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानामध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर उद्यानामधील बाकड्यावर मैत्रिणीसह गप्पा मारत बसल्या होत्या. याचवेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका लुटारूने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली. त्यानंतर तो बाजूला स्कूटी घेऊन उभ्या असलेल्या आपल्या साथीदारासह पळून गेला. या घटनेत लुटारूने सोन्याची चेन खेचताना जोराचा झटका मारल्याने पै यांच्या मानेला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com