टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पनवेल, ता. १ (वार्ताहर) : तळोजा एमआयडीसी भागात दुचाकीवरून खारी-बटर विक्री करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गत बुधवारी सकाळी तळोजा एमआयडीसीमध्ये घडली. या अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला असून तळोजा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील मृत जगदंबा इंद्रजीत यादव (३७) हा तळोजा येथील नावडा फाटा येथे राहण्यास होता. तसेच तो मिठाई, खारी-बटरची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास जगदंबा तळोजा एमआयडीसी भागात दुचाकीवरून मिठाई, खारी-बटर विक्रीसाठी घेऊन जात होता. दरम्यान तो तळोजा एमआयडीसीतील आदित्य बिर्ला कंपनीसमोर आला असता त्याच्या पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने त्याला धडक दिली. या अपघातात जगदंबा टेम्पोच्या खाली आल्याने त्याचे हेल्मेट फुटून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला असून तळोजा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com