बचत गटाच्या महिलांना ४५ लाखाचा मोबदला मिळणार,

बचत गटाच्या महिलांना ४५ लाखाचा मोबदला मिळणार,

उल्हासनगरात टॅक्स पावत्यांचे वाटप करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना ४५ लाखाचा मोबदला मिळणार,
काँग्रेसच्या आंदोलनाला यश

उल्हासनगर,ता.३०(वार्ताहर)-भरपावसात उल्हासनगरातील मालमत्तेच्या टॅक्स पावत्यांचे वाटप करूनही कोलब्रो कंपनीने बचत गटाच्या महिलांना मोबदल्यासाठी वाऱ्यावर सोडले होते.कांग्रेसने याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यावरही त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने आज महानगरपालिकेसमोर महिलांसोबत आंदोलन करताच या महिलांना ४५ लाख रुपयांचा मोबदला देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.काँग्रेसच्या आंदोलनाला यश आल्याने व थकीत मोबदला पदरात पडणार असल्याने बचत गटाच्या महिला सुखावून गेल्या आहेत.
महानगरपालिकेने कोलब्रो कंपनीला टॅक्स पावत्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे.जुलै २०२३ मध्ये कंपनीच्या वतीने २०० बचत गटाच्या महिलांना पावत्या वाटपाचे काम देण्यात आले.त्यांनी भरपावसात घरोघरी जाऊन पावत्यांचे वाटप केले.मात्र ८ महिने झालेत तरी महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात आला नव्हता.ही रकम ४५ ते ५० लाखाच्या घरात असून ती मिळावी म्हणून काँग्रेसच्या माजी गटनेत्या अंजली साळवे व जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.मात्र त्यास प्रतिसादच महानगरपालिका किंवा कंपनी कडून देण्यात येत नसल्याने अंजली साळवे,रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली बचत गटाच्या महिलांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन केले.कोलब्रो कंपनी गोबॅकचे पोस्टर्स झळकावले.
शेवटी महानगरपालिका प्रशासना तर्फे उपयुक्त डॉ.सुभाष जाधव,कर निर्धारक व संकलक जेठानंद करमचंदानी ह्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि कोलब्रो कंपनीला मनपातर्फे देयक अदा करण्यात आली आहे.त्यामुळे महिला बचत गटाच्या महिलांना येत्या तीनचार दिवसात बिल वाटपाचा मोबदला देण्याचे काम पूर्ण होणार असे लेखी आश्वासन दिले.यावेळी माजी गटनेत्या अंजली साळवे,जिल्हाध्यक्ष रोहित साळवे,महिला अध्यक्षा मनीषा महाकाळे,सिंधु रामटेके,मालती गवई,कालिंदी गवई,मंगला मुजुमदार,राकेश मिश्रा,अनिल यादव,शैलेंद्र रुपेकर,फरियाद शेख,फॅमिदा सैयद,कायद्याने वागा संघटनेचे संजय वाघमारे,सुरेश देशमुख,मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे,बचत गटाच्या महिला उपस्तिथ होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com