धूळ वाफेवरच्या पेरणीला सुरूवात

धूळ वाफेवरच्या पेरणीला सुरूवात

मोखाडा, ता. २ (बातमीदार) : पावसाची चाहूल लागताच मोखाड्यात खरिपाच्या धूळ वाफेवरच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यासाठी कृषी विभागाने बी-बियाणे, खते उपलब्ध करून दिले आहे. खतांचा काळाबाजार रोखून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वर्भभरातून मोखाडा तालुक्यात एकमेव केवळ खरिपाचेच पीक घेतले जाते. खरिपाच्या उत्पन्नावरच शेतकऱ्याला वर्षभर गुजराण करावी लागते. तालुक्यात खरिपाचे १२ हजार ७५९.५६ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये नागलीचे चार हजार ३२२ हेक्टर, वरईचे तीन हजार ८८५ आणि भाताचे दोन हजार १५ या मुख्य नगदी तृणधान्य पिकाचे एकूण १० हजार २२३ हेक्टर क्षेत्र आहे. त्या खालोखाल उडीद, कुळीद, तूर या कडधान्यांचे एकूण एक हजार ७८८ हेक्टर क्षेत्र आहे. भुईमूग, सुर्यफूल, खुरासणी आणि तीळ या गळीत धान्याचे ७४७.८० हेक्टर क्षेत्र आहे.

यंदा राज्यात वेळेत मान्सून दाखल होत असल्याचे हवामान खात्याने सूचित केले आहे. त्यामुळे मोखाड्यातील शेतकऱ्यांनी लगबग करून मान्सूनपूर्व शेतीची मशागत पूर्ण केली आहे. आता धूळ वाफेवरच्या पेरणीला सुरूवात केली आहे. त्यासाठी कृषी विभागाने सरकारी दरात बी-बियाणे उपलब्ध केले आहे. तसेच भरघोस पिकांसाठी खतेही उपलब्ध केली आहेत.

शहरासह तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर खतांचा साठा उपलब्ध केला आहे. या हंगामासाठी युरियाचा ४७३ आणि सुफलाचा २७ टन खतांचा पुरवठा केला आहे. खतांचा काळाबाजार रोखून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे.
- आकाश सोळुंखे,
मंडळ कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com